Thursday, 30 April 2015

वाचा अन् बिन्धास्त लिहा..!!✏

वाचा अन् बिन्धास्त लिहा..!!✏
                  (एक उपक्रम) 🎈
     आज एक नवा प्रयत्न केला मुलांच्या विचाराला नवं वळण देण्याचा. परिपाठ आटोपत असतांना मनात एक विचार डोकावून गेला की आज काही मुलांसोबत धम्माल करूया. व लगेच त्यांना सुचवले आज आपण असं करायचं का..सगळ्यांनी एक नविन पुस्तक वाचायचे व त्यातील तुम्हांला जी गोष्ट आवडली त्यावर मनसोक्त लिहायचे. ते कसंही लिहलं तरी चालेल. बोली भाषेत वा नेहमीच्या आपल्या भाषेत आपल्याला जसं सुचल तसं त्यावर लिहायचं. आणि ते लिहल्यावर त्याचं सर्वांसमोर ते मांडायचं..सगळी मुलं अगदी कान देवुन ऐकत होती. ऐकतांना त्यांच्या चेहर्यावरचे आनंदी हावभाव पाहुन मला सांगायला आणखी हुरूप येत होता. म्हटलं चला वेळेचा सदुपयोग करता येईल. आपले उर्वरित लेखी कामही पुर्ण करता येईल. आणि मुलांनाही ह्या उपक्रमातुन विचारांचा नवा आनंद देता येईल. मग काय पहिलीची मुले विचारात पडली आता आपलं कसं होणार..! आपल्याला तर फारसं वाचता पण येत नाही. अन् कसं लिहायचं..! असं काहीसं त्याच्या डोक्यात कुजबुज होत असावी मी जाणलं. अन् लगेच एक पर्याय  सुचला व आमचे दुसरीतील मुलांना म्हटले की तुम्ही पहिलीतील प्रत्येकांने एक मिञाला निवडायचे आणि त्याला पुस्तकातील गोष्ट वाचुन सांगायची. म्हटल्या म्हटल्या पहिलीतील चिमुकली साक्षी जोर्रात एस्स म्हणाली. म्हटलं जमलं..! अन् ईकडे दुसरीतल्या पंकजने  आपली काॅलरच थोटी टाईट केली. सांगायचं एवढचं की आता पहिली दुसरीचा वाचनाचा व मत मांडण्याचा प्रश्न मिटला. ते एकमेकांच्या सोबतीने त्यातुन नक्कीच काहीतरी मुल्य शिकतील हे पक्क होतं...मुलांना पुस्तकं वाटप केली आणि वर्गात शाळेच्या आवारात कुठेही बसा असं सांगितलं अन् काय मज्जा कुणी कुठे कुणी कुठे वाट्टेल ती जागा त्यांनी निवडली. क्षणात सर्व आवार शांत झाला कारण सगळी मंडळी वाचण्यात गर्क झाली होती. मोठं कौतुकच भारी चिमुकल्यांचं..! त्यांचं विश्वच आगळं.
      प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात व्यस्त होती. काहीजण चर्चा करत होते. तर काही सुचलं ते लिहित होते. काहींना जर अडचण आलीच तर मला अधुन मधून भेटायला येत होती. प्रशांतने तर कमालच केली म्हणाला "सर हुंडा घेऊ नका देऊ नका" काय हो.?" त्याने मीनाची गोष्ट वाचली असावी. त्यावर तो बोलत होता. त्याला हुंड्याबद्दल काही उदाहरण देउन स्पष्ट केलं. तर वैभव म्हणाला की एक मुलगी तांड्यावर राहत होती सर अन् तीला तीची लहान बहीण असल्याने तीला वागवावं लागायचं त्यामुळे तीला शाळा सोडावी लागली. आणखी एक त्याला नविन गोष्ट समजली की मीनाच्या वडीलांना वाचता आलं नाही म्हणुन एका दुकानदाराने कसं गंडवले..! त्यामुळे शाळा शिकणे व लिहीणे वाचणे किती महत्वाचे आहे त्याला हे कळले. कुणी झाशीची राणी वाचले. तर कुणी कसे वागावे कसे रहावे वाचले. असे अनेक त्यांचे अनुभव ऐकुन मन अगदी सुखावून जात होते...!! असं सगळं सुरु असतांना गावातील मंडळीही चिमुकल्यांकडे कौतुकाने पहात होती.

🍁मला उपक्रमातुन काय गवसलेे👉

🎈वाचनाची आवड निर्माण झाली.
🎈नविन माहीती मिळाली.
🎈वाचुन लिहण्यामूळे आकलन तर झालेच वाचलेलं स्मरणात राहण्यास मदत.
🎈मत प्रकटीकरणासाठी वाव.
🎈एखाद्या विषयावर निबंध लेखनाची पुर्वतयारी.
🎈पुस्तकांशी मैञी
🎈आत्मविश्वास वाढण्यास मदत.
🎈वाचुन सांगण्यामुळे बोलण्याचे धाडस भाषणाची पुर्वतयारी.
     असा आजचा दिवस सार्थकी ठरला..!!
👧👦👧👦👧👦👧👦

-किशोर  तळोकार (9673060762)
जि.प शाळा जांब.