.....नेहमीपेक्षा आज जरा वेगळाच अनुभव आला. इयत्ता चौथीवर इतिहासाचा तास घेत होतो. त्यात शिवाजी महाराज म्हटलं की, चिमुकल्याच्या चेह-यावर उत्सुकतेचे भाव बघायला मिळते. त्यांचा आवडीचा भाग म्हणजे शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापण्याचा त्यांचा प्रवास ! मुलांना शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्यांची निती, त्याची कार्यकुशलता,युक्तीश्रेष्टता त्यांच्यातील मानवतेचे गुणवैशिष्टे शिकवतांना खुप छान वाटते. आणि त्यात मुले ही तन्मयतेने एैकत असले की मोठ्या उत्साहाने त्यांचे चरिञ मुलांसमोर मांडावेसे वाटते. आणि प्रत्येक विद्यार्थी शिवाजी व्हावा आणि एक अद्वीतीय राष्ट्र घडावं अशी कल्पना मन करुन जाते. खरचं छञपतीचे आठवावे रूप,
आठवावा प्रताप !
शिकवता शिकवता किल्यांकडे वळलो. किल्याची तटबंदी त्याची भक्कम उभारणी ह्याचे वर्णन करायला लागलो. तेवढ्यात प्रशांतने प्रश्न विचारलाच...! " सर, हे एवढे मोठे किल्ले बांधले कसे असतील" प्रश्न मोठा चिकीत्सेचा, जिज्ञासेचा वाटला. आणि काहीतरी वेगळच डोक्यात आलं.! आणि ठेवला विषय बाजुला ! विचार केला आज मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्याचा प्रयत्न करुया. त्यांना किल्याबद्दलची माहीती सांगितली. त्याचे इथंभुत वर्णन केले. आणि त्यांना म्हटले "चला आपण आज किल्लेच तयार करुया !" माझे हे वाक्य त्यांच्या कर्णपटला वर पडताच त्यांचा एकच गल्का उडाला. सर्वजण अगदी आनंदाने आेरडायलाच लागले.! त्यांचा उत्साह व त्यांची किल्ले बणवण्याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यांना आता थांबवणे शक्य नव्हते. मग लगेच त्यांचे गट पाडले. व त्याचा एक नायक ठरवला. त्यानुसार प्रत्येक गटाला एकेक किल्ले वाटले. त्यांना लागणारे साहीत्य गोळा करायला पुर्ण स्वातंञ्य दिले. व त्यासाठी त्यांना कुठलीही कोणाचीही मदत घेता येईल असे सांगितले. मग काय त्यांच्या चेह-यावरचा आनंद व त्यांचे तेज पाहण्यालायक होते. परिसरातली जागा निश्चीत करायची होती. ... जागा ठरल्यात ! मग प्रत्येक गटाने आपली आपली योजना आखुन साहीत्य गोळा करायला सुरवात केली. नंतर मी त्यांना काहीवेळ स्वातंत्र्य मिळावे या हेतुने दुसरी व तिसरीच्या वर्गाला अध्यापन करत बसलो. आणि त्यांना अधुन मधुन त्यांच्या मध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन व मदत करावे असे ठरवले. बघता बघता चिमुकल्यांनी आपल्या कल्पनेने किल्ले साकारल्याचा पराक्रम करून दाखवला.
त्यांच्यातील अतीव उत्साहाने व आनंदाने हे कृत्य लिलया घडुन आणले होते. तेव्हा त्यांच्यामध्ये आलेला आत्मविश्वास हा त्यांनी तयार केलेल्या प्रतिकृती पेक्षाही मला सुखावुन गेला. त्यांच्यात किल्ल्याविषयीची कमालीची जाणिव निर्माण झाली होती. तत्कालीन वास्तु निर्मितीचा ऊद्देश, कार्यकुशलता ते थोडक्यात अनुभवायला लागले होते. व मग त्यांच्या चेहर्यावरील भाव पाहुन मनात समाधानाचं हसु उमटलं. आणि आज मला नेहमी पेक्षा वेगळाच अनुभव
आला.....!
लेखन- किशोर तळोकार
(दि.23/12/14: वेळ 10:35pm)